मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला नसला तरी मुंबई आणि पुण्यात कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात घट होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.
15 ते 22 एप्रिल दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात जवळपास 1.81 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने सांगितले आहे. तसेच राज्यात ज्येष्ठ रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधित असून घरातील वयस्कर नातेवाईकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत करोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. त्यामुळे राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी
राज्यात बुधवारी 431 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5649 वर पोहचली आहे. तर आतापर्यत २६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे १४८६ नवे रुग्ण आढळले असून, याच काळात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २१ हजार ३७० झाली असून, त्यापैकी ४३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत या आजाराने ६८१ जण मरण पावले आहेत आणि १८ हजार ८५९ जणांवर उपचार सुरू आहेत.