coronavirus: मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे, माजी आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:19 PM2021-03-14T20:19:17+5:302021-03-14T20:20:45+5:30

coronavirus in Maharashtra : मुंबईत धारावी, अंधेरी पूर्व व पश्चिम ,मालाड,बोरिवली याभागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

coronavirus in Maharashtra : Lockdown needed in Mumbai and Maharashtra, says former health minister Deepak Sawant | coronavirus: मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे, माजी आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

coronavirus: मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे, माजी आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर असून गेल्या 15 दिवसांमध्ये कोरोनाने पुन्हा डोक वर काढले आहे. (coronavirus in Maharashtra) नागरिकांनी मास्क लावा,सोशल डिस्टनसिंग पाळा, सतत हात धुवा,गर्दी टाळा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने  करत आहे. मात्र नागरिक बेपर्वाई करत असून याकडे दुर्लक्ष करत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.काल दिवसभरात मुंबई, ठाण्यात तीन हजार कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे.तर मुंबईत काल 1708 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. (Lockdown needed in Mumbai and Maharashtra, says former health minister Deepak Sawant )

 मुंबईत धारावी, अंधेरी पूर्व व पश्चिम ,मालाड,बोरिवली याभागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मुंबई सह राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबई सह राज्यात लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याची विनंती राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

मुंबई मध्ये नागरिकांच्या बेपर्वाईला आळा घालण्यासाठी थोडी सक्ती करणे आवश्यक आहे. कारण वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता आयसीयू बेड,ऑक्सीजन बेड यांची जास्त गरज पडेल. पुढील पंधरवडा जास्त कसोटीचा आहे. रेमीडिसिव्हरचा वापर लवकर करणे गरजेचे आहे. तसेच एसओपी व प्रोटोकाल तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने अंमलबजावणी करून कोरोनाला आला घालणे गरजेचे आहे. तसेच टेस्टिंग,ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट कडक केल्यास कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा बसेल असे डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला  सांगितले.

ज्या भागात रुग्ण संख्या अधिक आहे त्याभागातील फेरीवाल्यांवर  नियंत्रण ठेवणे,तसेच समुद्रकिनारे व सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या प्रवेशाला आळा घालणे,तसेच मॉल्स,चित्रपट गृह,रेस्टॉरंट आणि हॉटेल्स येथील कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे.

अनेक देश पुन्हा लॉकडाऊन कडे वळले आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी वेळीच कायदेशीर कारवाई करावी.तसेच एनजीओची मदत घेऊन सर्व्हेक्षण करुन कंटेन्टमेेंट झोन मधे सक्रिय रुग्ण ट्रॅक करणे आवश्यक आहे. हॉटेल कर्मचारी, दुकानदार, भाजीवाले,रस्त्यावरचे नाव्ही यांची नियमित कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे.

पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी नियमवली करणे, सलून मध्ये संपर्क कमी करणे,रस्त्यावरचे सलून बंद करणे,सोसायटी मधील गेट टू गेदर बंद करणे यांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची विनंती डॉ.दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
 

Web Title: coronavirus in Maharashtra : Lockdown needed in Mumbai and Maharashtra, says former health minister Deepak Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.