Join us

Coronavirus : महाराष्ट्राला मोठा दिलासा, दैनंदिन रुग्णवाढ ४० हजारांच्या खाली, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 8:15 PM

Coronavirus in Maharashtra : प्रचंड रुग्णवाढीमुळे गेल्या दीड महिन्यांपासून चिंतेत असलेल्या राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई - गेल्या तीन महिन्यांपासून राज्याची चिंता वाढवणारी कोरोनाची दुसरी लाट आता मोठ्या प्रमाणात ओसरल्याचे दिसत आहे. प्रचंड रुग्णवाढीमुळे गेल्या दीड महिन्यांपासून चिंतेत असलेल्या राज्याला आज मोठा दिलासा मिळाला आहे. (Coronavirus in Maharashtra) राज्यातील दैनंदिन रुग्णवाठ जवळपास सव्वा महिन्यानंतर ४० हजारांच्या खाली आली आहे. आज राज्यामध्ये कोरोनाच्या ३७ हजार २३६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात तब्बल ६१ हजार ६०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दैनंदिन मृत्यूंचा आकडाही मोठ्या प्रमाणात खाली आला आहे. (Maharashtra reports 37,236 new COVID-19  positive cases & 549 deaths in the last 24 hours)

आरोग्यं मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३७ हजार २३६ नवे रुग्ण सापडले आहेत. तर याच काळात जवळपास ६१ हजार ६०७ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून सहा लाखांच्या आत आली आहे. आता राज्यामध्ये ५ लाख ९० हजार ८१८ एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  

दरम्यान, राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ५१ लाख ३८ हजार ९७३ एवढी झाली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ६९ हजार ४२५ एवढी झाली आहे.  आज झालेल्या ५४९ मृत्यूंमुळे राज्यातील कोरोनाबळींचा आकडा हा ७६ हजार ३९८ वर पोहोचला आहे.  

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाच्या एक हजार ७९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ३ हजार ५८० जणांनी कोरोनावर मात केली आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्या