Join us

Coronavirus In Maharashtra: १५ दिवसांचा राज्यात कडक लॉकडाऊन करा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 6:29 AM

उच्च न्यायालयाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.

मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले असले तरी राज्यातील नागरिक त्याचे पालन न करता नाहक घराबाहेर पडत असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.

नीलेश नवलखा, स्नेहा मरजाडी यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर, खाटा, इत्यादींचा तुटवडा व कोरोनासंबंधी प्रश्नांवर जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व १५ दिवसांचा राज्यात कडक  लॉकडाऊन करा न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.

लोकांच्या हालचालींवर मर्यादा आणण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचे पालन केले जात असल्याचा विश्वास सरकारला आहे का? ज्या लोकांना महत्त्वाची कामे आहेत, तेच लोक घराबाहेर पडत आहेत का? लोकांनी किमान आपल्याबरोबर असलेल्या लोकांचा तरी विचार करावा. कोरोनाला अटकाव करण्यासाठी सरकार कठोर मेहनत घेत आहेत. मात्र, लोकच बेजबाबदारपणे वागत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार