मुंबई : राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांच्यामृत्यूचा आकडा १०० वर गेल्याने पोलीस दलात पुन्हा एकदा चिंतेची लाट पसरली आहे. आतापर्यंत ९ हजार ९६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी ७ हजार ८४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेली कोविड रुग्णालये, कोविड सेंटर, प्रतिबंधित क्षेत्र, अशा ठिकाणच्या बंदोबस्तासह अन्य सर्व प्रकारची कर्तव्ये राज्य पोलीस दल गेले चार महीने स्वतःचा जीव धोक्यात घालून काटेकोरपणे बजावत आहे. यातच राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्याप्रमाणात कोरोनाची बाधा झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गुरूवारी राज्य पोलीस दलाने जारी कलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात १०० पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यात ८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९३७ अधिकाऱ्यांसह ८ हजार १५९ असे एकूण ९ हजार ९६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ७२२ अधिकाऱ्यांसह ६३६२ पोलिसांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत २०७ अधिकारी आणि १७०५ अशा १ हजार ९१२ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.जलै महिन्यापासून पोलिसांभोवतीचा हा आकडा वाढत आहे. त्यात दिवसाला दोन ते तीन पोलिसांच्या मृत्यूच्या घटना समोर येत आहे.यापूर्वी घड़लेल्या एका घटनेत कोरोनामुळे भेंडीबाजार परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कुटुंबियाला पोलिसासह तीन जणांना गमाविण्याची वेळ ओढावली आहे.
हल्ले सुरुच...
३० जुलैपर्यंत पोलिसांवरील हल्ल्यांप्रकरणी ३२३ गुह्यांची नोंद झाली आहे. यात ८८३ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ८६ पोलीस जखमी झाले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू
Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न