CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 08:38 PM2020-05-03T20:38:30+5:302020-05-03T20:39:33+5:30

एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा एकूण 8613 वर गेला असून मृत्यूंचा आकडा 343 वर पोहोचला आहे.

Coronavirus Marathi news 441 patients diagnosed in Mumbai in a day, 21 died hrb | CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी

CoronaVirus in Mumbai मुंबईत दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान, २१ बळी

Next

मुंबई : महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही मुंबईमध्ये असून आज दिवसभरात ४४१ रुग्णांचे निदान झाले. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. 


याचबरोबर एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा एकूण 8613 वर गेला असून मृत्यूंचा आकडा 343 वर पोहोचला आहे. तर आजपर्यंत एकूण 1804 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ही आकडेवारी मुंबईतील आहे. नवी मुंबई मध्ये 25 रूग्ण वाढले; कोरोना बाधीतांची संख्या 314 झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 74 नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 


तर देशभरामध्ये १०९९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या २८०७० रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण मृत्यूंचा आकडा १३०६ वर गेला आहे. देशभरात आज कोरोनाचे नवे 2487 रुग्ण सापडले. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार; पुरेसे पुरावे सापडल्याचा अमेरिकेचा दावा

खूशखबर! मोबाईल, लॅपटॉप ऑनलाईन खरेदी करता येणार; ई-कॉमर्सला मान्यता

कुलभूषण जाधवसाठी अजित डोवालांचे मागच्या दराने प्रयत्न; हरीष साळवेंचा गौप्यस्फोट

आमच्यावर अश्लील शब्दांत टीका केली, आता भाजप नेत्यांकडून रडीचा डाव; जयंत पाटलांचा आरोप

Web Title: Coronavirus Marathi news 441 patients diagnosed in Mumbai in a day, 21 died hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.