CoronaVirus in Mumbai धोक्याची घंटा! राज्याच्या निम्मे नवे रुग्ण एकट्या मुंबईत; चिंतेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 10:48 PM2020-05-07T22:48:38+5:302020-05-07T22:56:24+5:30
आजही राज्यभरात १२१६ नवे रुग्ण सापडले आहेत. एकट्या मुंबईचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काल १२०० चा आकडा पार केल्याने चिंतेचे वातावरण असताना मुंबईतही राज्याच्या निम्म्याहून अधिक नवे रुग्ण सापडल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
आजही राज्यभरात १२१६ नवे रुग्ण सापडले आहेत. एकट्या मुंबईचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. मुंबईत दिवसभरात ६९४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात मुंबईमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात हा आकडा ४३ झाला आहे.
आज राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आजपर्यंत राज्यातून ३३०१ रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
207 patients have been discharged today which takes the tally of discharged patients to 3301. 43 deaths have been reported today; death toll rises to 694: Maharashtra Health Department #COVID19https://t.co/tOWDSQLgVT
— ANI (@ANI) May 7, 2020
महत्वाच्या बातम्या...
चिंताजनक! राज्यात सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या १२०० पार
मुलायमसिंह यादव आयसीयूमध्ये; बुधवारी रात्री तब्येत बिघडली
लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात
अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा