Join us

CoronaVirus in Mumbai मुंबई हादरली! आज नवे रुग्ण हजारासमीप; मृत्यू मात्र घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 9:05 PM

आज राज्यात १६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात ४४ कोरोना बधितांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नवीन नियमांच्या मदतीमुळे आज ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबई : देशाची आणि महाराष्ट्राची आर्थिक राजधानीमध्ये कोरोनाने कहर केला आहे. जसाजसा पावसाळा जवळ येऊ लागला आहे तसतशी नागरिक आणि प्रशासनाची धाकधूक वाढू लागली आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढवणार का, असा प्रश्न उभा ठाकलेला असताना मुंबईतील आजची रुग्णांची आकडेवारी मुंबईकरांसह राज्याची झोप उडविणारी आहे. 

आज राज्यात १६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात ४४ कोरोना बधितांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नवीन नियमांच्या मदतीमुळे आज ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र, यात मुंबईचा वाटा खूप मोठा आहे. मुंबईमध्ये आज दिवसभरात ९९८ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या 16579 एवढी झाली आहे. 

तर मुंबईमध्ये २५ जणांचा बळी गेला आहे. नवी मुंबईत १० आणि पुण्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण मृत्यूंची संख्या ६२१ झाली आहे. आज दिवसभरात ४४३ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. यामुळे या रुग्णांची एकूण संख्या ४२३४ झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पहिल्यांदाच १६०० पार; मृत्यू घटले

बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'आमदार' झाले; ९ जणांचे विधान परिषद सदस्यत्व जाहीर

Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार, कामगारांना भाडेकरारावर घरं देणार

अवघा देश भिकेला लावला; आता पाकिस्तानी सैन्याला दणक्यात पगारवाढ हवीय

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या