मुंबई : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. मुंबईमध्ये आज नव्या रुग्णांची संख्या कालपेक्षा दीडशेने वाढली आहे. तर दिवसभरात १९ मृत्यू झाले आहेत. मृत्यंचा हा आकडा काहीसा दिलासा देणारा आहे.
आज मुंबईत ८७५ नवे रुग्ण सापडले असून ६२५ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दिवसभरात १९ जणांचा मृत्यू झाला असून २१२ जण बरे झाले आहेत. दरम्यान, मुंबईत एकूण १५०२६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर १३५६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण ३००४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५०८ जणांचा मृत्यू झाला आहे.
वरील १९ मृत रुग्णांपैकी १३ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील १० रुग्ण पुरुष व ९ रुग्ण महिला आहेत. काल कोरोनाबाधितांचा आकडा ७२२ होता. आज थेट दीडशेने त्यामध्ये वाढ झाली आहे. तर २७ जणांचा मृत्यू झाला होता. आज यामध्ये घट झाल्याने ही एक दिलासा देणारी बाब ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus लॉकडाऊन संपेना! वैतागून हजारो कामगारांचे जथ्थेच्या जथ्थे परराज्यात रवाना
काँग्रेसचं ठरलं! उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून देणार
लय भारी! विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर
एकच धून 6 जून! रायगडावर शिवराज्याभिषेक होणारच; छत्रपती संभाजीराजेंची घोषणा
Vidhan Parishad Election: ...तर शिवसेनेने एक जागा कमी लढवावी, भाजपाचा युतीधर्मावरून टोला
Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी