CoronaVirus मुंबईला मोठा दिलासा! नव्या रुग्णांची संख्या निम्म्याने घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 09:03 PM2020-05-12T21:03:20+5:302020-05-12T22:23:22+5:30
मुंबईतील आकडेवारी गेल्या काही आठवड्यांपासून ७०० ते ९०० च्या आसपास घुटमळत होती.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक विळखा असलेल्या मुंबईसाठी आज दिलासा मिळाला आहे. नव्या कोरोना रग्णांची संख्या निम्म्याने घटली आहे. तर आज दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्याप राज्याची आकडेवारी आलेली नसून मुंबईची आजची आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे. आज मुंबईत ४२६ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून हा आकडा ७०० ते ९०० च्या आसपास जात होता. तर आज यात निम्म्याने घट झाली आहे. दिवसभरात २०३ रुग्ण बरे झाले आहेत. तर आज ६१३ संभाव्य कोरोनाबाधितांना भरती करण्यात आले आहे.
426 new positive cases & 28 deaths reported in Mumbai today, total positive cases here rises to 14781, death toll rises to 556. A total of 203 people were discharged from hospitals today, 3313 people have been discharged till date: Municipal Corporation Greater Mumbai #COVID19pic.twitter.com/kTucvkX10H
— ANI (@ANI) May 12, 2020
यामुळे मुंबईत संभाव्य रुग्णांची संख्या १६२०६ झाली असून बाधित रुग्णांची संख्या १४७८१ झाली आहे. आजपर्यंत ३३१३ रुग्ण बरे झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा ५५६ झाला आहे.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus चिंताजनक! राज्यात मृतांचा आकडा पुन्हा पन्नाशी पार; रुग्णांमध्ये घट
Breaking स्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी
CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार
चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण
CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले