CoronaVirus News: मुंबईतल्या 'या' भागात मृत्यूदर १३ टक्क्यांवर; किरीट सोमय्यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:29 AM2020-05-04T10:29:08+5:302020-05-04T10:45:13+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर ४ टक्के असताना शिवाजीनगरमध्ये १३ टक्क्यांवर

CoronaVirus Marathi News bjp leader kirit somaiya express concern over Mortality rate in shivaji nagar kkg | CoronaVirus News: मुंबईतल्या 'या' भागात मृत्यूदर १३ टक्क्यांवर; किरीट सोमय्यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News: मुंबईतल्या 'या' भागात मृत्यूदर १३ टक्क्यांवर; किरीट सोमय्यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र

Next

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या साडे आठ हजारांहून अधिक आहे. धारावीसारख्या दाटीवाटीचा परिसर असलेल्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्येही गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यावरुन भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहिलं आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ४ टक्के असताना शिवाजीनगरमधील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर १३.४ टक्के इतका आहे. मुंबईत कोरोनाचे ८ हजार १७२ रुग्ण सापडले. त्यापैकी ३२२ जणांचा मृत्यू झाला. तर शिवाजीनगरमध्ये ३५२ पैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाजीनगरमधील परिस्थिती गंभीर होत आहे का?, असा सवाल सोमय्यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. त्यांनी याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्रदेखील लिहिलं आहे.



पालिकेच्या एम पूर्व विभागातील शिवाजीनगरमधील परिस्थिती अतिशय भीषण आहे. या परिसरातील अनेक भागांमध्ये गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही. १ ते २ मे या कालावधीत शिवाजीनगरमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आसपासच्या रुग्णालयांमध्ये पुरेसे बेड नाहीत. ५० ते ६० वर्षे वय असलेल्यांना उपचार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकार सध्या विधान परिषद निवडणुकीत व्यस्त असल्यानं त्यांना याकडे पाहायला वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.



किरीट सोमय्या यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील कोरोनाच्या स्थितीवरुनही ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. वरळीतल्या कोरोना रुग्णांची संख्या सध्या आठशेपेक्षा जास्त आहे. लवकरच वरळीतील कोरोनाबाधितांची संख्या १ हजारवर पोहोचेल. भारतात हा उच्चांक असेल. ठाकरे सरकार यालाच वरळी पॅटर्न म्हणतं, असा टोला सोमय्यांनी लगावला आहे.

घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

गरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती

... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा

Read in English

Web Title: CoronaVirus Marathi News bjp leader kirit somaiya express concern over Mortality rate in shivaji nagar kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.