मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या साडे आठ हजारांहून अधिक आहे. धारावीसारख्या दाटीवाटीचा परिसर असलेल्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. गोवंडीतल्या शिवाजीनगरमध्येही गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यावरुन भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहिलं आहे.मुंबईतील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ४ टक्के असताना शिवाजीनगरमधील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर १३.४ टक्के इतका आहे. मुंबईत कोरोनाचे ८ हजार १७२ रुग्ण सापडले. त्यापैकी ३२२ जणांचा मृत्यू झाला. तर शिवाजीनगरमध्ये ३५२ पैकी ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाजीनगरमधील परिस्थिती गंभीर होत आहे का?, असा सवाल सोमय्यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. त्यांनी याबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्रदेखील लिहिलं आहे.
CoronaVirus News: मुंबईतल्या 'या' भागात मृत्यूदर १३ टक्क्यांवर; किरीट सोमय्यांचं आरोग्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 10:29 AM