मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून नवा उच्चांक गाठत आहे. कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतचा २४ तासांतील नव्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल चार लाख ७३ हजारांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका वेळीच ओळखला नाही, तर परिस्थिती आणखी चिंताजनक होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही.
वांद्रे येथील ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्याच्या परिसरातील चहावाला काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर आता कलानगरमधील मातोश्री बंगल्याच्या बाजूलाच असलेल्या एका बंगल्यात कोरोना रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बंगला सील करण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी मातोश्रीवरील कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. 'मिडडे' या वृत्तपत्रानुसार, मातोश्रीवर पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं. कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण मातोश्री बंगला सॅनिटाईज करण्यात आला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य या कर्मचाऱ्याचा थेट संपर्कात आलेलं नाही, असं सांगण्यात येत आहे. मात्र ठाकरे कुटुंबीयांनी आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. याआधी मातोश्री'च्या गेट क्रमांक २ जवळ असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ असणाऱ्या चहावाल्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मातोश्रीबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आता दीड लाखांच्या टप्प्यावर आहे. पण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात बुधवारी ३,८९० नवीन रुग्णांची नोंद झाली असून २०८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात १,४२,९०० रुग्ण झाले असून ६,७३९ बळी गेले आहेत. सध्या राज्यात ६२,३५४ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी २०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७२ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १३६ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बळींचा आकडा ६,७३९ झाला आहे, सध्या राज्यातील मृत्यूदर ४.७२ टक्के एवढा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गाठला नवा उच्चांक
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान
'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर
"मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्या"
"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला