Join us

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 19:49 IST

मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयावर पहिल्याच दिवशी विरोधी भूमिका घेत दुकाने बंद केली.

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी धारावीने आज मुंबईची चिंता वाढविली आहे. रोज ३०-४० च्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असताना आज हा आकडा जवळपास दुपटीने वाढला आहे. 

मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयावर पहिल्याच दिवशी विरोधी भूमिका घेत दुकाने बंद केली. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुकानांसमोर उसळलेली गर्दी पाहून हा निर्णय घेण्यात आला. तर राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्येही कोरोनामुळे दारु विक्री बंदच ठेवण्यात आली आहे. 

केंद्र सरकारने कंपन्या, कामांसाठी शिथिलता दिलेली असताना आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टी भागामध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ७३३ झाला आहे. तर एकूण मृत्यूंची संख्या २१ झाली असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.

 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ

CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्याधारावी