मुंबई - कोरोनाविरोधात लढण्यासाठी देश सज्ज झाला आहे. वैद्यकिय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मंडळी कोरोनाचा सामना करण्यासाठी मदतीचा हात देत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने (एचयूएल) आता पुढाकार घेतला आहे. एचयूएलने आरोग्यसेवा कर्मचारी व प्रदात्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने हॉर्लिक्सचे १.५ लाख पॅक्स दान करण्याची कटिबद्धता दाखवली आहे. आरोग्यसेवा कर्मचारी कोरोना विषाणूविरोधात लढा देत आहेत. आतापर्यंत भारतातील ३९ कोविड रुग्णालयांपर्यंत हे पॅक्स पोहोचले आहेत आणि लवकरच १२ प्रमुख शहरांमधील सर्व प्रमुख कोविड रुग्णालयात पोहोचणार आहेत.
हॉर्लिक्समध्ये दूध, गहू व सातूच्या पीठाच्या पोषक घटकांसह प्रथिने, झिंक, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ड असे २३ महत्त्वपूर्ण पौष्टिक घटक आणि सेलेनियम, फॉलिक अॅसिड, लोह, जीवनसत्त्व बी१२ व जीवनसत्त्व बी६ सारखे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे इतर पौष्टिक घटक असतात. झिंक, जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व ड हे आजाराविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी मदत करणारे प्रमुख पौष्टिक घटक आहेत. रुग्णालयांना दान करण्यात येत असलेल्या हॉर्लिक्समध्ये झिंक, जीवनसत्त्व क आणि जीवनसत्त्व ड यांचा समावेश आहे.
एचयूएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी दिेलेल्या माहितीनुसार, ''आपण अनपेक्षित आरोग्य संकटाचा सामना करत आहोत आणि प्रत्येकाने देशाला या संकटाविरोधातील लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. सुरक्षित राहणे व आरोग्य उत्तम ठेवण्यासोबत चांगल्या स्वच्छताविषयक सवयी अंगिकारणे ही देखील आपली जबाबदारी आहे. आपण नैसर्गिकरित्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणा-या आरोग्यदायी आहाराचे सेवन केले पाहिजे. आज आम्ही आरोग्यसेवा कर्मचारी व प्रदात्यांना या आजाराविरोधातील लढ्यामध्ये साह्य करण्यासाठी विविध रुग्णालयांना हॉर्लिक्स देऊ शकलो आहोत, याचा मला आनंद होत आहे.'' एचयूएलने हल्लीच कोविड १९ विरोधातील लढ्यामध्ये भारताला मदत म्हणून १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले
CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?
Zoom अॅपचा वापर करता?, मग असा ठेवा आपला डेटा सुरक्षित