मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांचा अपवाद वगळता सर्वच जणांनी मास्क घातले होते. याबद्दल राज यांना बैठकीनंतर पत्रकारांशी प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी यावर हसत हसत भाष्य केलं. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात मुंबईतील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत आपण मांडलेल्या मुद्द्यांची माहिती राज ठाकरेंनी पत्रकारांना दिली. त्यावेळी तुम्ही फेस मास्क का लावला नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही, असं उत्तर राज यांनी हसत हसत दिलं. मनसे अध्यक्ष मंत्रालयात बैठकीसाठी पोहोचले. ते लिफ्टची वाट पाहत असताना देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरदेखील त्यांच्यासोबत होते. राज यांचे पुत्र अमित ठाकरेदेखील तिथे उपस्थित होते. या सगळ्यांनीच मास्क घालते होते. त्यामुळे राज यांनी मास्क का घातलेला नाही, याची चर्चा मंत्रालयात सुरू झाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मास्क घालणं बंधनकारक आहे. मास्क न घातल्यास १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मास्कशिवाय पोहोचले राज ठाकरेVIDEO: महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्यसायन हॉस्पिटलमध्ये मृतदेह आणि कोरोना पेशंट एकाच ठिकाणी, व्हिडीओ व्हायरल
CoronaVirus News: मंत्रालयातील बैठकीला येताना तुम्ही मास्क का घातला नाही?; राज ठाकरे हसत हसत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 3:32 PM