मुंबई: राज्यातील वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. मंत्रालयात ही बैठक होणार होत असून त्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सगळे नेते मंत्रालयात पोहोचले. त्यावेळी राज ठाकरे वगळता सर्वच जणांनी मास्क घातले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मास्क घालणं बंधनकारक आहे. मास्क न घातल्यास १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात मुंबईतील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी तसंच काँग्रेसचे प्रमुख नेते त्याचबरोबर विरोधी पक्ष भाजप आणि मनसेलाही निमंत्रित केलं गेलं आहे.या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार असल्याचं समजतं. याशिवाय विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठकीला हजर राहण्यासाठी मंत्रालयात पोहोचले. ही मंडळी लिफ्टसाठी उभी असताना राज ठाकरे वगळता इतर सर्वच नेत्यांनी मास्क न घातल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज यांनी मास्क का घातलेलं नाही, याची चर्चा मंत्रालयात सुरू झाली. VIDEO: महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्यसायन हॉस्पिटलमध्ये मृतदेह आणि कोरोना पेशंट एकाच ठिकाणी, व्हिडीओ व्हायरलछत्रपती संभाजीराजेंच्या 'त्या' ट्विटनंतर देवेंद्र फडणवीसांची दिलगिरीलॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या मजुरांची संख्या किती?; मोदी सरकारनं दिली 'धक्कादायक' माहिती
CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मास्कशिवाय पोहोचले राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 2:39 PM