मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या तब्बल पाच लाखांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 52 हजार 765 झाली असून बळींचा आकडा 7 हजार 106 इतका झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.25 टक्के झाले आहे. राज्यात मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, मुंबईत रुग्णांनी 72 हजारांचा टप्पा गाठला आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले 'कृष्णकुंज' मध्ये आता कोरोनाने शिरकाव केला आहे.
राज ठाकरे यांच्या दोन चालकांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता कृष्णकुंजमध्ये घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळलं आहे. राज यांच्या घरात काम करणारे कर्मचारीदेखील विशेष काळजी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी राज यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. ते कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. वांद्रे येथील ठाकरे यांच्या 'मातोश्री' बंगल्याच्या परिसरातील चहावाला काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर आता कलानगरमधील मातोश्री बंगल्याच्या बाजूलाच असलेल्या एका बंगल्यात कोरोना रुग्ण सापडला आहे. या घटनेनंतर बंगला सील करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल
CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा
घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं
CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य
"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"
CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा