CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 02:45 PM2020-08-31T14:45:09+5:302020-08-31T14:59:17+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील रुग्णांचा आकडा 36,21,246 वर पोहोचला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 64,469 लोकांना आपला जीव गमवावा लागला आह.
मुंबई - देशात कोरोनाचा धोका वाढला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील रुग्णांचा आकडा 36,21,246 वर पोहोचला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 64,469 लोकांना आपला जीव गमवावा लागला आह. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 78,512 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 971 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. मात्र मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पण याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा वेगही समोर आला आहे. कोरोनाची लक्षणं जाणवत नसतानाही अनेकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहे. वेळीच कोरोनाचा धोका लक्षात न आल्यामुळे तसेच वेळेत उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे.
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोना लसीबाबत आरोग्यमंत्री म्हणतात...https://t.co/3T5J5c7REp#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronavirusVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) August 31, 2020
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे विश्लेषण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, 31 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आतमध्येच आपला जीव गमवावा लागत आहे. तर 59 टक्के रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयात भरती झाल्यानंतर चार दिवसांच्या कालावधीत झाला आहे. सरकारकडे हा रिपोर्ट पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरणhttps://t.co/YWV7zK2HU0#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronavirusVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) August 28, 2020
मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 1 लाख 43 हजारांच्या वर गेली आहे. तर सात हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. समितीने तब्बल पाच हजार 200 लोकांच्या मृत्यूचे विश्लेषण केले असता ही माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील विविध रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चिंता वाढवणारी आकडेवारी ही सातत्याने समोर येत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा प्रसार होण्यामागे 'हे' लोक आहेत जबाबदार, वेळीच व्हा सावधhttps://t.co/3qs7HHgCvc#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2020
महत्त्वाच्या बातम्या
ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...
"...तर 2024 ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल"
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
धक्कादायक! कोरोनाग्रस्त नेत्याने रुग्णालयातून काढला पळ, पुलावरुन उडी मारुन केली आत्महत्या