CoronaVirus in Mumbai मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 09:20 PM2020-05-06T21:20:57+5:302020-05-06T21:21:56+5:30
राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक १२३३ रूग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १६, ७५८ वर पोहोचली आहे.
मुंबई : राज्यामध्ये आज दिवसभरात १२०० नवे रुग्ण सापडले असताना नुकताच मुंबईचा आकडा आला आहे. मुंबईत आज ७५९ नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा कालपर्यंतच एकूण राज्याचा होता. आज एकट्या मुंबईतच ही मोठी वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यामध्येही मोठी वाढ नोंदविली गेली आहे.
राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक १२३३ रूग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १६, ७५८ वर पोहोचली आहे. तर ३४ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ६५१ बळी गेले आहेत. आज २७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३०९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या मद्य विक्रीच्या निर्णयावर पहिल्याच दिवशी विरोधी भूमिका घेत दुकाने बंद केली. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुकानांसमोर उसळलेली गर्दी पाहून हा निर्णय घेण्यात आला. तर राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्येही कोरोनामुळे दारु विक्री बंदच ठेवण्यात आली आहे. मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टी भागामध्ये आज दिवसभरात कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
तर आज मुंबईमध्ये ७६९ नवे रुग्ण सापडले एकूण रुग्णांचा आकडा १०५२७ वर गेला आहे. तर दिवसभरात मुंबईमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूंचा आकडा ४१२ झाला आहे.
Mumbai COVID-19 cases cross 10,000-mark with 769 new additions; Case count 10,527 while death toll rises by 25 to 412: Brihanmumbai Municipal Corporation
— Press Trust of India (@PTI_News) May 6, 2020
महत्वाच्या बातम्या...
OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले
धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ
CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले