CoronaVirus मुंबईत नव्या रुग्णांचे प्रमाण घटले निदान; आज २० मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 08:42 PM2020-05-11T20:42:21+5:302020-05-11T21:11:37+5:30
राज्याची आकडेवारी अद्याप यायची आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे.
मुंबई : रविवारपेक्षा मुंबईतील नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर मृतांचा आकडा सारखाच राहिला आहे. तर १०६ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.
राज्याची आकडेवारी अद्याप यायची आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे. तर मुंबईमध्ये आज दिवसभरात ७९१ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ५६७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण १५५९३ रुग्ण सापडले असून यापैकी १४३५५ रुग्णांवर उपचार सुर आहेत.
आज २० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा ५२८ वर गेला आहे. तर १०६ रुग्णांना घरी पाठविण्यात आल्याने एकूण आकडा ३११० वर गेला आहे. डिस्चार्जसाठी नवीन नियमावली जारी झाल्याने आता बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढणार आहे.
काल मुंबईत ८७५ नवे रुग्ण सापडले होते. ६२५ संभाव्य कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर दिवसभरात १९ जणांचा मृत्यू झाला होता. २१२ जण बरे झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus कोरोनापासून गावांना लांब ठेवा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती
पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी
Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा
धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू
CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय