Join us  

CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 12:01 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 2,56,611 वर गेली आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल 9983 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 206 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात 7135 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाच्या संसर्गाचे संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 975 झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजारांच्या वर गेली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईतून एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोनाचा मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या भागातून सुखावणारी माहिती मिळत आहे. धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून येथील परिस्थिती गंभीर आहे. मात्र आता धारावीतील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. गेल्या सात दिवसांत एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार धारावीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1912 रुग्ण आढळले आहे. तर 71 जणांना आपला जीव गमवावा लागला. पण 30 मे ते 7 जून या काळात कोरोनाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

धारावीमध्ये वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही खूप मेहनत केली आहे. आता त्याचा हळूहळू परिणाम समोर येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. धारावीमध्ये 29 एप्रिल रोजी कोरोनाचे 91 रुग्ण आढळले तर 7 मे रोजी 84 रुग्ण आढळले. यानंतर तातडीने लोकांचं स्क्रिनिंग केलं गेलं. काहींना आयसोलेट करण्यात आलं. यामुळेच काही दिवसांनी रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. योग्य वेळी उपचार मिळालेल्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दरही कमी झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महापालिकेने काही परिसराचं रुपांतर हे आयसोलेशन आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतर केलं. तिथे लोकांना ठेवण्यात आले होते. 

तब्बल 38000 लोकांना घरामध्ये क्वारंटाईन करण्यात आलं तर 8500 लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. यासोबतच योग्य ती सर्व खबरदारी घेण्यात आली. या नियोजनामुळेच धारावीतील परिस्थिती सुधारते आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 51 हजार 647 नमुन्यांपैकी 85 हजार 975 नमुने पॉझिटिव्ह (15.58 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 58 हजार 463 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक  क्वारंटाईन सुविधांमध्ये 77 हजार 654 खाटा उपलब्ध असून सध्या 28 हजार 504 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत अशी माहिती दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी 'ही' खास मिठाई मदत करणार; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार?

Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!

CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रमृत्यू