मुंबई : जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळूच सरकली होती. अत्यंत दाटीवाटीने असलेली घरे, अस्वच्छता आदींचे मोठे आव्हान मुंबई महापालिकेसमोर होते. मात्र, आज एक दिलासादायक आकडेवारी हाती आली आहे.
धारावीमध्ये एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचीही भंबेरी उडाली होती. आज ३८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून धारावीमध्ये सापडलेल्या एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ४९६ झाली आहे. यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर महत्वाचे म्हणजे गेल्या दोन दिवसांत धारावीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये आज कोरोना ग्रस्त रुग्णांची मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात आज ९७ जण नवे रुग्ण सापडले आहेत. तर नालासोपारा -विरार मधून 14 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus ठाणे जिल्ह्यात कहर! आज 97 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या 1109
जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...
तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
"भारत आणि बंगालदरम्यान काहींना युद्ध हवेय"; ममता बॅनर्जींवर जावडेकरांचा गंभीर आरोप
लॉकडाऊनमध्ये नशेत वेगाने कार घेऊन तरुण बेडरूममध्ये घुसला अन्...