मुंबई : दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. कालच ही संख्या ४२६ वर आलेली असताना आजचा आकडा थेट दुपटीने वाढला आहे. तर राज्यातही मोठी वाढ नोंदली गेली असून हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
दिवसभरात आज राज्यात 1495 नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आता पर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 25,922 वर पोहोचला असून एकूण ५५४७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या नियमांमुळे राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आज ४२२ रुग्णांना सोडण्यात आले.
राज्यातील आजच्या एकूण मृत्यूंपैकी ४० मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत आज ८०० नवे रुग्ण सापडले. हा आकडा कालच्यापेक्षा दुपटीने वाढला आहे. तर दिवसभरात ५२८ संभाव्य कोरोनाबाधित भरती झाले आहेत. तसेच ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत मृतांचा आकडा ४० वर गेला असून एकूण मृतांची संख्या ५९६ झाली आहे. राज्याच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी एकट्या मुंबईत १५५८१ रुग्ण सापडले आहेत. राज्यात आजपर्यंत २५९९२ रुग्ण सापडले आहेत.
महत्वाच्या बातम्या....
CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये विक्रमी वाढ; एकूण आकडा २५ हजार पार
खूशखबर! विशेष रेल्वे सेवा सुरु होणार; २२ मेपासून वेटिंग लिस्ट
मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा
बाबो! तब्बल दोन महिन्यांनी दुकाने, सिनेमा गृहे उघडली; अवस्था पाहून शॉक बसेल
रेडमीचे फोन पुन्हा महागले; दीड महिन्यांतील मोठी वाढ
सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ