मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 02:50 PM2020-05-19T14:50:46+5:302020-05-19T15:00:00+5:30

कोरोना व्हायरची चाचणी घेताना त्या व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत.

coronaVirus Marathi news Shocking More than 100 Positive Patient not traceable in mumbai hrb | मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्याला शोधताना नाकीनऊ येत आहेत. टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचाऱ्यांकडून ही माहिती भरताना चूक होते. विक्रोळीच्या एन वॉर्डमध्ये कोरोनाचे  १२ रुग्ण बेपत्ता झाले आहेत.

मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले असून मुंबई मोठा हॉटस्पॉट बनली आहे. एकट्या मुंबईतच कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ हजारावर गेला आहे. यामुळे आधीच तणावात असताना मुंबई महापालिकेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तब्बल १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अचानक गायब झाले आहेत. 


कोरोना व्हायरची चाचणी घेताना त्या व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत. किंवा टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचाऱ्यांकडून ही माहिती भरताना चूक होते. अशावेळी तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्याला शोधताना नाकीनऊ येत आहेत. असाच धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. 


अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी मुंबई मिररला सांगितले की, मुंबईमधून १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाले आहेत. त्यांनी चुकीची माहिती दिल्याने शोधणे कठीण झाले आहे. अशा लोकांना ट्रॅक करण्याचे अन्यही मार्ग आहेत. बांद्र्याच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती. मात्र, पत्ता देताना बांद्रा पूर्व असा उल्लेख केला होता. मात्र, ही कंपनी पश्चिमेची होती. अशा बेपत्ता लोकांची नावे पाठवून मुंबई महापालिकेने आधारचे डिटेल्स मागविले असल्याचे त्यांनी सांगितले. 


विक्रोळीच्या एन वॉर्डमध्ये कोरोनाचे  १२ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. अधिकारी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. अंधेरी पूर्वमध्ये तर २७ जण बेपत्ता झाले आहेत, असे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळ यांनी सांगितले. धारावीमध्ये तर २९ जण बेपत्ता झाले आहेत. मात्र, यापैकी काही जणांना शोधण्यात यश आले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या....

CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याची तयारी; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय

राज्यातून ग्रीन, ऑरेंज झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये मोठे बदल

तुम्ही कोणत्या झोनमध्ये? राज्यात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

हवाई दलाचा हवेतल्या हवेत असा पराक्रम...जो पाहून उर भरून येईल

CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर

Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले

Read in English

Web Title: coronaVirus Marathi news Shocking More than 100 Positive Patient not traceable in mumbai hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.