coronavirus: मारी बिस्किटात २२ छिद्र असतात, लॉकडाऊनचं असंही होतंय काऊंटडाऊन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 06:59 PM2020-03-26T18:59:28+5:302020-03-26T18:59:55+5:30
कोरोनामुळे घरबसल्या अनेक कामे करता येऊ शकतात. जसं की एक किलो गव्हामध्ये किती दाणे असतात.
मुंबई - कोरोना लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपापल्या घरात बसून आहे. जो-तो घरात बसूनच वेळ खर्ची करत आहे. कुणी आपला वाचनाचा छंद जोपासत आहेत, तर कुणी टेलिव्हीजनवर लक्ष ठेऊन आहेत. कुणी, कुकींग करतंय तर कुणी वेस सिरीज पाहण्यात दंग आहे. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानुसार देशात २१ दिवसांची एकप्रकारे संचारबंदीच लागू करण्यात आली आहे. मात्र, या संचारबंदीच्या काळात कोरोना व्हायरसवरुन मिम्स आणि जोक्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मनचिसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करुन कोरोना लॉकडाऊनच्या काळात घरबसल्या काय करता येईल, हे सूचवले आहे.
कोरोनामुळे घरबसल्या अनेक कामे करता येऊ शकतात. जसं की एक किलो गव्हामध्ये 8790 दाणे असतात. फरसाणमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. तर मारी गोल्डच्या बिस्कीटाला किती छिद्रे असतात याचा अभ्यास चांगल्याप्रकारे करता येतो. मनचिसेचे नेते यांनीही याबाबतचं एक ट्विट करुन, मारी बिस्किटाला बावीस छिद्रे असतात, असे सांगत आता घरी बसून असा टाईमपास करता येतो, असेच खोपकर यांनी सूचवले आहे.
मारी बिस्किटाला बाविस छिद्रे आहेत!!!
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 25, 2020
बालाजी वेपर्सच्या ५ रुपयाच्या पुड्यात १४ वेपर्स असतात आणि १० रुपयांच्या पुड्यात २९ वेपर्स असतात.... बोर होतंय म्हणून कलिंगड कापलं तर ३८५ बिया मिळाल्या, पण घराबाहेर अजिबात पडलो नाही. असे विनोदाचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.