Coronavirus : कोरोनाशी लढू या, स्वच्छतेची गुढी उभारू या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 01:13 PM2020-03-25T13:13:40+5:302020-03-25T16:14:46+5:30
Coronavirus : सर्वसामान्यांमध्ये कोरोनासारख्या महामारीबद्दल जागृती झाली पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवा, हात साबणाने धुवावेत, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.
मुंबई - जीवन जगताना मध्येच एखादा रोग यावा आणि सर्वच जीवन विस्कळीत होणे. ही सध्याची सत्य परिस्थिती झाली आहे. याच दरम्यान भारतीय संस्कृतीचे मानले जाणारे अनेक सण येत आहेत. त्यातील गुढीपाडवा एक. परंतु गुढीपाडव्याबद्दल वेगवेगळी मत नागरिकांमध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या मताचा आदर व्हायला हवा. कोरोनाग्रस्त सामान्य माणसाच्या संपर्कात येऊ नये आणि सर्वच जनसामन्यांमध्ये तो पसरू नये म्हणून गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील संहित्यरत्न लोकशाहीर अन्नाभाऊ साठे नगर, मानखुर्द या वस्तीमधील रहिवाशी माया बोरकर यांनी एक नवा उपक्रम केला.
माया बोरकर या स्त्री मुक्ती संघटनेच्या महिला परिसर भगिनी आहेत. मुंबईला स्वच्छ ठेवण्यात त्या आपले योगदान देत असतात. साधारणतः गुढीला साडी, नवीन कपडा लावतात, कळस लावतात. परंतु माया बोरकर यांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी गुढीला प्रथमतः मास्क लावला, हँडग्लोव्स, डेटॉल, सॅनीटायझर, लावून आधुनिक युगाची गुढी उभारली. यामागचा उद्देश असा आहे की सर्वसामान्यांमध्ये कोरोनासारख्या महामारीबद्दल जागृती झाली पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवा, हात साबणाने धुवावेत, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.
Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थनाhttps://t.co/quSEtQ2Ujz#coronavirusinindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2020
माया बोरकर यांचे जनतेला आवाहन
सरकारला साथ द्या. महाभयंकर परिस्थिती निर्माण होण्याअगोदरच सावध राहा. गरज पडली तरच घराच्या बाहेर पडा. आपली घरातील उपस्थिती देशासाठी मदत ठरेल. या कोरोना महामारीवर मात करण्यासाठी सज्ज राहा. घरात राहा आनंदी राहा.
#IndiaFightsCorona २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये नेमकं काय बंद, काय सुरू राहणार याची सविस्तर माहिती.
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2020
संपूर्ण बातमीसाठी क्लिक करा-https://t.co/iTJzBdLPNqpic.twitter.com/fDMoNqKk0I
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! …तर भारतात 13 लाख लोकांना होऊ शकतो कोरोना, शास्त्रज्ञांचा इशारा
Coronavirus : पंतप्रधान मोदींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, खऱ्या हिरोंसाठी केली प्रार्थना
Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! देशातील रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद
Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव