CoronaVirus स्थलांतरीत मजूर कुठलाही असो, उपाशी राहणार नाही; अनिल देशमुखांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:29 PM2020-03-31T16:29:44+5:302020-03-31T16:29:58+5:30

लॉक डाऊन संपेपर्यंत या सर्व लोकांची अन्न-पाण्याची, राहण्याची व आरोग्य चाचणीची सोय केली जावी ,असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

CoronaVirus migrant laborers will not stay starve; Anil Deshmukh promise | CoronaVirus स्थलांतरीत मजूर कुठलाही असो, उपाशी राहणार नाही; अनिल देशमुखांचे आश्वासन

CoronaVirus स्थलांतरीत मजूर कुठलाही असो, उपाशी राहणार नाही; अनिल देशमुखांचे आश्वासन

Next

मुंबई : आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भायखळा, मुंबई येथील रिचर्डसन कृडासच्या आवारात राहत असलेल्या बेघरांची व स्थलांतरित मजुरांची भेट घेतली. त्यांच्या व्यथा-अडचणी जाणून घेतल्या व त्यांना अन्न वाटलं.
माझ्याकडून या गरीब जनतेची सेवा होऊ शकली हे भाग्य मानतो. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी  सांगितल्याप्रमाणे राज्यातील कुणीही कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उपाशी राहणार नाही. याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.
गरीब, रंजले-गांजले, आदिवासी, रोजंदारी कामगार कोणत्याही राज्यातील असोत, कोरोना विरूद्धच्या लढाईत त्यांची उपासमार होऊ नये यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जनतेला तसं मी आश्वासित करतो, असेही ते म्हणाले. बेघरांची व स्थलांतरित मजदूरांचे तपशील जमा करून लॉक डाऊन संपेपर्यंत या सर्व लोकांची अन्न-पाण्याची, राहण्याची व आरोग्य चाचणीची सोय केली जावी ,असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

Web Title: CoronaVirus migrant laborers will not stay starve; Anil Deshmukh promise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.