Coronavirus: जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वॉरंटाईन; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्यानं खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 11:07 AM2020-04-13T11:07:55+5:302020-04-13T11:53:15+5:30
कोरोना पॉझिटीव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने एका तरुणाला बंगल्यावरील मारहाण प्रकरणी चर्चेत असलेले मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना पॉझिटीव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचाऱ्यााला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. या कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात जितेंद्र आव्हाड देखील होते. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सेल्फ क्वॉरंटाईन म्हणजेच 'होम क्वॉरंटाईन'चा तसेच याच पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात काही पत्रकारही होते. त्यांनाही सेल्फ क्वॉरंटाईनचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्राला धडक दिल्यानंतर शासन आणि प्रशासनातील लोक रस्त्यावर उतरून परिस्थिती हाताळत आहेत. राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर राहून काम करत आहेत. यामध्ये आघाडीवर राहून काम करणारा मुंब्रा येथील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याचे समोर आले आहे.