Coronavirus: पिठलं भाकरी अन् ठेचा! मनसे कार्यकर्त्यानं सुरु केला अस्सल मराठमोळ्या जेवणाचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 02:31 PM2020-06-07T14:31:38+5:302020-06-07T14:32:06+5:30

अशा संकटाच्या काळात मराठी तरुण हिंमतीनं उद्योगधंद्यात उतरल्याचं दिसून येत आहे.

Coronavirus: MNS activist started the business of authentic Marathi food in corona crisis | Coronavirus: पिठलं भाकरी अन् ठेचा! मनसे कार्यकर्त्यानं सुरु केला अस्सल मराठमोळ्या जेवणाचा व्यवसाय

Coronavirus: पिठलं भाकरी अन् ठेचा! मनसे कार्यकर्त्यानं सुरु केला अस्सल मराठमोळ्या जेवणाचा व्यवसाय

Next

मुंबई  - चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आहे. गेल्या २ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प पडले, अनेक परप्रांतीय मजुरांनी आपापल्या राज्यात स्थलांतरित केले. त्यामुळे कोरोनानंतरच्या काळात स्थानिकांना रोजगार आणि व्यवसाय वाढवण्याची संधी प्राप्त झाली आहे.

लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातून परराज्यात मजूर गेले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा संकटाच्या काळात मराठी तरुण हिंमतीनं उद्योगधंद्यात उतरल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मराठी मुलं भाजीपाल्या व्यवसाय करत आहेत. मनसेकडून अशा तरुणांना प्रोत्साहित केले जात आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्यांनं कोरोना संकटकाळात वारी तृप्त खवय्यांची अशा नावानं अस्सल मराठामोळ्या जेवणाची मेजवाणी सुरु केली आहे.

मनसेच्या नेत्या शालिनी पाटील यांनी याबाबत ट्विट करुन म्हटलं आहे की, संकटातील संधी साधत राजगड कार्यालयातील आमचा सहकारी तुषार पाटील याने पिठलं भाकरी, ठेचा व वांग्याचे भरीत असा मराठमोळा मेनू घरपोच देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. एका मराठी तरुणाच्या या उपक्रमास सर्वांनी पाठिंबा देऊन त्याचे मनोबल वाढवूया अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा देत कौतुक केले आहे.

तुषार पाटील या तरुणाकडून दादर, माहिम, प्रभादेवी या भागात विनामुल्य घरपोच सेवा पुरवण्यात येत आहे. त्यासाठी 9870926629 या क्रमांकावर संपर्क करुन त्याला ऑर्डर देता येतील. पिठलं भाकरीसोबतच खमंग पुरणपोळी, उकडीचे मोदक, थालीपीठ, मिसळ-पाव, तसेच मांसाहार प्रेमींसाठी नॉनव्हेज जेवणाची मेजवाणीही घरपोच देण्यात येणार आहे.

Web Title: Coronavirus: MNS activist started the business of authentic Marathi food in corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.