Video:...अन् मनसे नेत्याला अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 01:23 PM2020-06-10T13:23:29+5:302020-06-10T13:33:54+5:30

गेल्या काही दिवसात अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळत नसल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Coronavirus: MNS Leader Sandeep Deshpande emotional over critical situation in a hospital beds | Video:...अन् मनसे नेत्याला अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव

Video:...अन् मनसे नेत्याला अश्रू अनावर; रुग्णालयातील बिकट परिस्थितीचा भयावह अनुभव

Next
ठळक मुद्देरुग्णांसाठी बेड्स उपलब्ध होत नसल्याचा मनसे नेत्याचा दावा मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० हजारांच्या वर लोक मरतायेत, गोड बोलून काहीच होणार नाही - संदीप देशपांडे

मुंबई – देशात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ९० हजारांच्या आसपास पोहचला आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा कहर वाढतच आहे. मुंबईत आजच्या घडीला ५० हजाराहून जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे.

गेल्या काही दिवसात अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळत नसल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. उपचाराअभावी लोकांचे मृत्यू होत आहेत हे भयावह चित्र मुंबईत समोर येत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या या कारभारावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप देशपांडे यांच्या डोळ्यातून अक्षरश: पाणी आले. देशपांडे यांच्या ओळखीतील एका व्यक्तीला बेड न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगताना संदीप देशपांडे यांच्या डोळ्यातून पाणी आले. मनसेच्या अधिकृत पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत संदीप देशपांडे म्हणतात की, रुग्णांची अतिशय वाईट अवस्था आहे, एका काकांनी आजारी असल्याने १९६ फोन करुन बेडची व्यवस्था झाली नाही, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, इतकी वाईट अवस्था लोकांची झाली आहे. अधिकाऱ्यांना फोन करुन ते फोन उचलत नाहीत, लोकांची अशी अवस्था आहे, फक्त बेड्स उपलब्थ आहेत असं खोटं सांगतात पण परिस्थिती तशी नाही, ८०० बेड्स उपलब्ध आहेत असं सांगितलं जातं. कोविड १९ वगळता इतर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. वारंवार अधिकाऱ्यांना संपर्क करुनही कोणीही उत्तर देत नाही. आरोग्य यंत्रणेची दुरावस्था आहे. लोक मरतायेत, फक्त गोड बोलून काहीच होणार नाही अशा शब्दात आपल्या भावनांना वाट करुन दिली.

मनसेच्या अधिकृत पेजवर याबाबत लिहिलं आहे की, भारताची आरोग्य व्यवस्था किती पोकळ आहे, हे एव्हाना सर्वांना कळालं असेलच. तरीही प्राप्त परिस्थितीत आजाराशी लढताना पण जेंव्हा आपलीच माणसं, जी प्रशासनात असतात तेच मनाचे कप्पे बंद करून बसतात आणि तेंव्हा जनतेची हतबलता पाहून अश्रू अनावर होतात असं म्हटलं आहे.  

 

Read in English

Web Title: Coronavirus: MNS Leader Sandeep Deshpande emotional over critical situation in a hospital beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.