CoronaVirus: मुंबई परिक्षेत्रात ४०० हून अधिक कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 02:59 AM2020-04-24T02:59:02+5:302020-04-24T02:59:24+5:30
बरे होणाऱ्यात तरुणाईचे सर्वाधिक प्रमाण
मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना दुसºया बाजूला दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईसह ठाणे शहर- ग्रामीण, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि मिरा भार्इंदर या परिसरांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिवसागणिक वाढते आहे. या रुग्णांमध्ये सर्वाधिक तरुणाईचे प्रमाण आहे. मुंबईत ३७४ तर ठाणे परिमंडळात सुमारे १०० जण कोरोना (कोविड-१९) मुक्त झाले आहेत.
राज्यात २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता साधारणत: ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनातून ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर मुंबईत ३७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ९६ जण बरे झाले आहेत. त्यात ठाणे शहरातील २३ जण, कल्याणमधील ३३, नवीमुंबई २६, मीरा-भार्इंदर १० आणि उल्हासनगर १ व ठाणे ग्रामीण तीन इतक्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात एकूण रुग्णांपैकी कोविडमुक्त होण्याचे प्रमाण १३ टक्के आहे. मुंबई - ठाण्यात ३१ ते ४० वयोगटातील जवळपास १६४ जण बरे झाले आहेत. त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली तरीही दुसरीकडे उपचारांना चांगला प्रतिसाद देऊन बरे होणाºया रुग्णांचे प्रमाणही सकारात्मक आहे.