Join us

Coronavirus : कोरोनाबाधित पोलिसांची संख्या सातशेहून अधिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 8:36 PM

Coronavirus : विविध पोलीस घटकात अनेक अधिकारी व अंमलदार 'होम क्वारटाईन' झाले असून त्याच्या चाचणीचे अहवाल अद्याप यायचे आहेत, त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

ठळक मुद्दे कोरोनाच्या विषाणूमुळे आतापर्यंत मुंबईतील तीन हवालदारासह  राज्यतील एकूण पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पोलीस वर्तुळातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग  सर्वसामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांमध्येही वाढत राहिला आहे. राज्य पोलीस दलात आतापर्यंत  81 अधिकाऱ्यांसह 714 जणांना त्याची लागण झालेली आहे. त्याशिवाय  विविध पोलीस घटकात अनेक अधिकारी व अंमलदार 'होम क्वारटाईन' झाले असून त्याच्या चाचणीचे अहवाल अद्याप यायचे आहेत, त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

कोरोनाच्या विषाणूमुळे आतापर्यंत मुंबईतील तीन हवालदारासह  राज्यतील एकूण पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी बंदोबस्तामध्ये असताना त्यांना या  विषाणूची लागण झाली. आणि उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले आहे.त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पोलीस वर्तुळातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

Corona Virus : विराट कोहली-अनुष्का शर्मा यांची मुंबई पोलिसांना आर्थिक मदत

 

CoronaVirus कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे 9 नवे रुग्ण; चार पोलिसांना लागण

 

Coronavirus : जे जे मार्ग पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, १२ पोलिसांना लागण 

राज्यात एकूण 81 अधिकारी व 633 अंमलदाराना कोविड-19 ची लागण झालेली आहे. त्यापैकी बहुतांशजण मुंबई पोलीस दलातील आहेत. बाधा झालेल्यापैकी 10 अधिकारी व 51 अंमलदार हे त्यातून बरे होऊन घरी परतले आहेत. अद्याप 648 जणांवर विविध पोलीस घटकातील रुग्णालयात  उपचार सुरु आहेत.

टॅग्स :पोलिसमुंबईमहाराष्ट्रकोरोना वायरस बातम्या