मुंबई : कोरोना झाल्यानंतर महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात अधिक प्रतिपिंडे निर्माण होत असल्याचे समोर आले. युरोपियन जर्नल ऑफ इम्युनोलाॅजीच्या अभ्यास अहवालानुसार, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर निर्माण होणारी प्रतिपिंडे (अँटिबाॅडीज) तब्बल सात महिन्यांच्या कालावधीपर्यंत शरीरात राहत असल्याचे आढळून आले आहे.डॉ. विराज सोनी यांनी सांगितले, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कोरोनाच्या विषाणूंविरोधात लढण्यासाठी प्रतिपिंडांची निर्मिती करते. संसर्गाच्या तीन आठवड्यांनंतर लक्षणांची तीव्रता कमी होऊन प्रतिपिंडे अधिक वाढीस लागतात. तसेच, पुरुषांच्या शरीरात महिलांच्या तुलनेत अधिक प्रतिपिंडे दिसून आली आहेत, त्याचप्रमाणे प्रतिपिंडांच्या निर्मितीस वयाचे बंधन नसल्याचा निष्कर्षही अहवालात मांडण्यात आला. जागतिक स्तराचा विचार केल्यास ९० टक्के रुग्णांच्या शरीरात प्रतिपिंडांचा कालावधी मोठा असल्याचे दिसून आले. शरीरात प्रतिपिंडे तयार झाल्याने कोरोनाच्या विषाणूंपासून संरक्षण होते.
coronavirus: महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात निर्माण होताहेत अधिक अँटीबॉडी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 2:53 AM