मुंबई : धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान जरी पालिकेने पेलले असले तरी त्या परिसरासोबतच जी उत्तर विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या माहीम आणि दादर परिसरात मुंबईतील सर्वाधिक ३९५ मृत्यूंची नोंद झाली आहे.मार्चपासूनचा प्रादुर्भाव पाहिला, तर आतापर्यंत ८६,१३२ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर चार हजार ९३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीच्या काळात भायखळा - नागपाडा, सायन - वडाळा, धारावी, वरळी असे शहर भागातील काही विभाग हॉटस्पॉट बनले. जास्तीतजास्त लोकांची तपासणी, तत्काळ निदान आणि योग्य उपचाराचा उपयोग करत धारावीतील प्रसार रोखण्यात आला.मात्र पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मृत्यूंची नोंद जी उत्तर विभागात झाल्याचे समोर आले आहे. त्यापाठोपाठ कुर्ला - साकीनाका परिसरात ३७७, अंधेरी पूर्व - विलेपार्ले पूर्व - जोगेश्वरी पूर्व येथे ३७५, भांडुपमध्ये ३१५ आणि बांद्रा पूर्व- खार पूर्व - सांताक्रूझ पूर्व येथे ३१३ मृत्यूची नोंद झाली. सर्वात कमी ४९ मृत्यूंची नोंद कुलाबा - फोर्ट या परिसरात झाली आहे.रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीमुंबईतील रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४५ दिवसांवर पोहोचला आहे. यामध्ये बी सँडहर्स्ट रोड विभागात १०९ दिवस तर वांद्रे पूर्व, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व या विभागात १०८ दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत आहे. मुलुंड आणि दहिसर विभागात २२ दिवसांनी रुग्ण संख्या दुप्पट होत आहेत.मृत्युंबाबत पालिकेने पुरविलेली आकडेवारीविभाग एकूण रुग्ण सक्रिय रुग्ण मृत्यूधारावी माहीम दादर ५३१० १३०० ३९५कुर्ला, साकीनाका, चांदिवली ४३४८ ६०४ ३७७जोगेश्वरी, अंधेरी, विले पार्ले पूर्व. ५८३४ १७४५ ३७५भांडुप,पवई,कांजुरमार्ग ५०५६ १५३४ ३१५वांद्रे पूर्व, खार पूर्व, सांताक्रुज पूर्व ३६४४ ६२० ३१३
coronavirus: मुंबईतील सर्वाधिक मृत्यू धारावी, दादर, माहीममध्ये, धारावीतील समूह संसर्ग रोखण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 5:59 AM