CoronaVirus News: विलेपार्ले ते जोगेश्वरी सर्वाधिक रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ४०७६
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 01:06 AM2020-06-16T01:06:53+5:302020-06-16T01:07:04+5:30
विले पार्ले पूर्व, जोगेश्वरी पूर्व, आणि अंधेरी कोरोना हॉटस्पॉट
मुंबई : कोरोना हॉट स्पॉट बनलेल्या वरळी, धारावी, कुर्ला विभागामध्ये आता रुग्ण संख्येवर हळूहळू नियंत्रण येत असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी विले पार्ले पूर्व, जोगेश्वरी पूर्व, आणि अंधेरी या के पूर्व विभागात आतापर्यंत मुंबईतील सर्वाधिक चार हजार ७६ रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ संख्या सरासरी २.६५ टक्के असताना के पूर्व विभागात हे प्रमाण ३.९ टक्के एवढे आहे.
मुंबईत आतापर्यंत ५८ हजार १३५ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २६ हजार २२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहर भागातच रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून आले. वरळी, धारावी, भायखळा आणि कुर्ला असे काही विभाग हॉट स्पॉट बनले. हळूहळू कोरोनाचा प्रसार उपनगरात वाढू लागला. अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी लोकं के पूर्व विभागात राहत असल्याने रुग्णांची संख्या वाढली असेही सांगण्यात येत आहे.
के पूर्व विभागात सुमारे साडेआठ लाख लोकसंख्या आहे. तसेच कोरोना बाधित रुग्णांवर मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मिशन बेगिन अगेन अंतर्गत मुंबईतील व्यवहार सुरू झाल्यानंतर के पूर्व विभागातील व्यावसायिक आणि औद्योगिक वसाहती पुन्हा सुरू झाल्या आहेत. तसेच येथील विमानतळ, मोठे हॉटेल्स एमआयडीसी सुरू झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार गेल्या काही दिवसांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सर्वाधिक रुग्ण असलेले विभाग
विभाग एकूण रुग्ण डिस्चार्ज सध्या रुग्ण रोजची रुग्णवाढ
के पूव ४०७६ १६९६ २२०६ ३.९ टक्के
(जोगेश्वरी पूर्व, अंधेरी आणि विले पार्ले पूर्व)
जी उत्तर ३८३४ २२७९ १३३३ १.५ टक्के
(धारावी, माहिम, दादर)
एल ३४५८ १६६२ १६७५ १.५ टक्के
कुर्ला परिसर