Coronavirus : कोरोनामुळे एमआरव्हीसीचे प्रकल्प लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 03:08 PM2020-03-29T15:08:07+5:302020-03-29T15:11:12+5:30
Coronavirus : ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेचे काम बंद, एमयूटीपी-२ मधील पूर्ण होत असलेला प्रकल्प रखडला
कुलदीप घायवट
मुंबई - मुंबई महानगराचा चेहरा पालटणारे प्रकल्प अनेक वर्षांपासून हाती घेतले आहेत. मात्र निधी, जागेचे नियोजन, नागरिकांचे पुनर्वसन अशा अनेक कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडले आहेत. यात आता कोरोनामुळे एमआरव्हीसीचे प्रकल्प आणखीन लांबणीवर गेले असून प्रकल्पांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या कामाने वेग धरला होता. मात्र हे काम कोरोनामुळे बंद झाले आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) यांच्याद्वारे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) हाती घेतले आहेत. एमयूटीपी-2 मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिका, सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिका आणि ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका हे येतात. या तिन्ही प्रकल्पांना 2008 साली मंजुरी मिळाली. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे हे तिन्ही प्रकल्प मंदगतीने सुरू होते. आता कोरोनामुळे या प्रकल्पांना ब्रेक लागला आहे.
एमयूटीपी-2 मधील प्रकल्पात ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिकेचे काम वेगात सुरू होते. या प्रकल्पाचे आतापर्यंत या मार्गाचे सिव्हील काम पूर्ण झाले आहे. तर, रुळाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होणार होते. त्यानंतर ओव्हरहेड वायर यंत्रणा, सिग्नल यंत्रणा ही कामे केली जाणार होती. मात्र कोरोना विषाणूमुळे पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला. परिणामी, या प्रकल्पाला लेटमार्क लागणार आहे.
विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून ‘कानउघडणी’; गरज नसताना गर्दी कराल तर... @CMOMaharashtra#CoronaUpdate#Maharashtrahttps://t.co/KFjxBcrnSr
— Lokmat (@MiLOKMAT) March 29, 2020
ठाणे-दिवा पाचवी-सहावी मार्गिका या प्रकल्पासाठी अंदाजित खर्च 140 कोटी रुपये होता. मात्र प्रकल्प रखडल्याने सुमारे 500 कोटी रुपये खर्च लागणार होता. मात्र आता कोरोनामुळे काम बंद झाल्याने आणखीन खर्च वाढण्याची शक्यता आहे. यासह पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 522 कोटी रुपये होता. हा खर्च सुमारे 900 कोटी रुपयांवर आला आहे. तर, मध्य रेल्वे प्रशासनाकडून सीएसएमटी-कुर्ला पाचवी-सहावी मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 659 कोटी रुपये होता. हा खर्च सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांवर आला आहे. मात्र आता कोरोनामुळे याही प्रकल्पाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे-दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेमुळे एक्स्प्रेससाठी खुला मार्ग तयार होईल. त्यामुळे उपनगरीय लोकल मार्गावरील ताण कमी होईल. उर्वरित चार मार्गिका लोकलसाठी वापरण्यात येणार आहेत. पाचवी आणि सहावी मार्गिका तयार झाल्यास मध्य रेल्वे मार्गावर 50 ते 60 फेऱ्या वाढविण्यात येतील.
कोरोनाशी मुकाबला करणाऱ्यांसोबत नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'; पाहा काय मागितली मदत? #CoronaUpdate#MannKiBaat#NarendraModihttps://t.co/LxzyCScP7w
— Lokmat (@MiLOKMAT) March 29, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : इटलीत परिस्थिती गंभीर! कोरोनाशी लढणाऱ्या 51 डॉक्टरांना गमवावा लागला जीव
Coronavirus : कंपनी असावी तर अशी! एप्रिलमध्ये 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार 25 टक्के जास्त पगार
Coronavirus : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा, गावाकडे निघालेल्या 13 जणांचा मृत्यू
Coronavirus : धक्कादायक! दारुची दुकानं बंद असल्याने 5 जणांची आत्महत्या
Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड