Coronavirus Omicron Variant Patients numbers increased : काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख खाली येत होता. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron Variant) व्हेरिअंटचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत. बुधवारी मुंबईत २ हजार ५१० कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यानंतर आता गुरुवारी मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू केली आहे.
मुंबईमध्ये जमावबंदी लागू केल्यानंतर आता जमावबंदी आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोकळ्या जागांमध्ये किंवा बंदिस्त जागांमध्ये पार्टीचं अथवा कोणत्याही उपक्रमाच्या आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. ३० डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधील, रेस्तराँ, हॉटेल्स, ओपन स्पेस किंवा बंदिस्त जागांमध्ये नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचं किंवा पार्टींचं आयोजन करता येणार नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी मुंबईत खाटांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवल्याने महापालिकेने जम्बो कोविड केंद्र सुरु केली. एमएमआरडीए आणि सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केंद्रांची देखभाल खासगी संस्थांकडे सोपविण्यात आली आहे. मात्र रुग्ण संख्येत घट झाल्यानंतर यापैकी पाच केंद्रे बंद करण्यात आली. परंतु, मागील आठड्यापासून रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे बंद जम्बो कोविड केंद्रे देखील सुरु करण्यात येणार आहेत.