coronavirus in Mumbai:मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के खाटा वापरात, ४८ तासांत यंत्रणा सज्ज करा, आयुक्तांची ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:23 PM2021-03-19T22:23:44+5:302021-03-19T22:24:48+5:30

coronavirus in Mumbai: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्ण वाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहेत.

coronavirus in Mumbai: 50 per cent beds in municipal and private hospitals in Mumbai, use the system in 48 hours, the BMC commissioner warned | coronavirus in Mumbai:मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के खाटा वापरात, ४८ तासांत यंत्रणा सज्ज करा, आयुक्तांची ताकीद

coronavirus in Mumbai:मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के खाटा वापरात, ४८ तासांत यंत्रणा सज्ज करा, आयुक्तांची ताकीद

Next

 मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्ण वाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहेत. या काळात बाधित रुग्‍णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने सौम्‍य, मध्‍यम तसेच तीव्र लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांसाठी पुरेशा संख्‍येने खाटांची गरज भासणार आहे यासाठी महापालिकेने गेल्यावर्षी प्रमाणेच रुग्णालयातील खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. (50 per cent beds in municipal and private hospitals in Mumbai, use the system in 48 hours, the BMC commissioner warned)

कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने काळजी केंद्रे बंद केली. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये राखीव खाटाही कमी करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या महिन्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर दोन आठवड्यांपासून दररोज दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी तब्बल तीन हजार बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत २० हजार १४० बाधित रुग्ण आहेत. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने महापालिकेने चाचणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज ५० हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत महापालिका आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांचा आढावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चव्हाण यांनी शुक्रवारी घेतला. 

प्रमुख रुग्णांमध्ये खाटा भरल्या...
मोठ्या रुग्णालयांमध्ये चांगले उपचार मिळतील असा असं लोकांचा विश्वास असतो. त्यामुळे अंधेरी येथील सेव्हन हिल्स सारख्या रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. प्रत्यक्षात कोरोना काळजी केंद्र व पालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये ५० टक्के खाटा रिक्त आहेत.
 
४८ तासांमध्ये सज्ज व्हा..
जुलै २०२० मधील स्थितीशी तुलना करता, मुंबईतील शासकीय रुग्‍णालयांमधील खाटांची संख्‍या साध्य अधिक आहे. पालिका रुग्‍णालयांमध्‍ये देखील ही क्षमता वाढविण्‍यात येत आहे. त्‍याच धर्तीवर खासगी रुग्‍णालयांनी पुन्‍हा एकदा कोविड खाटांची संख्या येत्‍या ४८ तासांमध्‍ये वाढवा, अशी सूचना आयुक्तांनी सर्व खाजगी रुग्णालयांना केली आहे. यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू खाटा असाव्या, त्यासाठी साधनसामुग्री व मनुष्‍यबळ आदी सर्व व्‍यवस्‍था युद्ध पातळीवर करून सर्व कार्यवाही पूर्ण केल्‍याची माहिती रुग्‍णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच पालिकेला द्यावी, अशी सुचनाही करण्यात आली आहे.

अवास्तव बिल आकारल्यास खबरदार...
काही खासगी रुग्‍णालये रुग्‍णांना दाखल करुन घेताना अग्रीम रक्‍कम भरण्‍याचा आग्रह धरत असून त्‍याशिवाय रुग्‍णांना दाखल करुन घेत नसल्‍याचे समोर आले आहे. अशा रुग्‍णालयांनी ८० टक्‍के सरकारी कोट्यातील खाटांवर दाखल करुन घेताना अग्रीम रक्‍कमेचा आग्रह धरु नये. तसेच शासनाच्या दरानुसार रुग्‍णांना देयक द्यावे. रुग्‍णालयांमध्‍ये कोविड-१९ उपचारांसाठी कोणत्‍या सुविधेला किती दर आकारले जातात, त्‍याचे दर्शनी फलक लावावेत. खासगी रुग्‍णालयांमध्‍ये पुन्‍हा नव्‍याने पालिकेचे प्रत्येकी दोन लेखापरीक्षक नेमण्‍यात येणार आहेत. रुग्‍णांना महागडी औषधे, इंजेक्‍शन आदी पुरविताना खासगी रुग्‍णालयांनी रुग्‍णांच्‍य नातेवाईकांची संमती घ्‍यावी. तसेच व्‍यवहारांमध्‍ये पारदर्शकता ठेवावी. जेणेकरुन नंतर देयकांबाबत वाद निर्माण होणार नाहीत, असे आयुक्तांनी बजावले आहे.

तरच थेट वॉक इन भरती...
शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये कोविड-१९ रुग्‍णांना दाखल करताना वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातूनच व्‍यवस्‍थापन करण्‍यात येते. खासगी रुग्‍णालयांमध्‍ये देखील रुग्‍ण दाखल करताना सर्वप्रथम वॉर्ड वॉर रुमच्‍या माध्‍यमातूनच कार्यवाही करावी. तीव्र बाधा असलेल्‍या, अतिदक्षता उपचारांची आवश्‍यक असलेल्‍या रुग्‍णांना ते थेट आल्‍यास (वॉक इन) दाखल करुन घ्‍यावे. मात्र, अशा रुग्‍णांची माहिती वॉर्ड वॉर रुमला तत्‍काळ कळवावी, अशी सूचना पालिकेने केली आहे.


लक्षणे नसल्यास घरीच घ्या उपचार 
लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ८० टक्के आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अकारण रुग्णालयात दाखल होऊ नयेत, जेणेकरून बाधित रुग्णांसाठी खाटांची अडचण निर्माण होईल. घरी  विलगीकरणाची सोय नसल्यास पालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रकार         उपलब्ध खाटा...   दाखल रुग्ण...   रिक्त

एकूण खाटा   ११२११ ...  ५५८६ ..५६२५                
अति दक्षता  १५२७...  ९१५....  ६१२                
ऑक्सिजन   ८३५२ .... ३८६४..... ४४८८
व्हेंटिलेटर     ९६१ ...   ६१६ .....  ३४५

Web Title: coronavirus in Mumbai: 50 per cent beds in municipal and private hospitals in Mumbai, use the system in 48 hours, the BMC commissioner warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.