CoronaVirus चिंताजनक! मुंबईत आज दिवसभरात ५१० रुग्णांचे निदान; १८ मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 08:39 PM2020-05-04T20:39:12+5:302020-05-04T20:41:10+5:30
रुग्णांचा आकडा पाहता मुंबई महापालिकेने हॉस्पिटलची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आज दिवसभरात एकट्या मुंबईमध्ये ५१० नवे रुग्ण सापडले आहेत. तर १८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याची आकडेवारी अद्याप यायची असून यामध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
आज दिवसभरात एकूण ४३६ संभाव्य कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. तर १०४ जण बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. मुंबईत आज १८ जणांचा मृत्यू झाला असून कालच्यापेक्षा हा आकडा कमी आहे. एकूण मृत्यूंची संख्या ३६१ वर गेली आहे.
रुग्णांचा आकडा पाहता मुंबई महापालिकेने हॉस्पिटलची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही क्षमता सध्याच्या ३ हजार वरून ४७५० खाटा एवढी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना असलेला धोका लक्षात घेता झोपडपट्टी भागातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन लाख ४३ हजारावर घरांची तपासणी करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बापरे! कोरोनामुळे वृद्धाचा मृत्यू; मुंबईतील हॉस्पिटलने १६ लाखांचे बिल आकारले
गिलगिट बाल्टिस्तान तत्काळ खाली करा; भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा
CoronaVirus लॉकडाऊनमध्ये भारतासारखीच सूट दिली; 'या' देशांमध्ये कोरोनाचा धोका वाढला