Coronavirus In Mumbai: मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या आकड्यात घोळ; जवळपास चार हजार रुग्ण दाखवले कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:43 AM2021-06-26T07:43:50+5:302021-06-26T07:44:37+5:30

दिवसभरात ६९३ बाधित

Coronavirus In Mumbai: Confusion in the number of active corona patients in Mumbai; Nearly four thousand patients showed less | Coronavirus In Mumbai: मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या आकड्यात घोळ; जवळपास चार हजार रुग्ण दाखवले कमी

Coronavirus In Mumbai: मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या आकड्यात घोळ; जवळपास चार हजार रुग्ण दाखवले कमी

googlenewsNext

मुंबई : मुंबईत गुरुवारी १४ हजार  ८१० सक्रिय रुग्ण होते. शुक्रवारी ५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र मुंबई पालिकेने दिलेल्या आकडेवारीत जवळपास चार हजार रुग्ण कमी दाखवून सध्या १० हजार ४३७ सक्रिय रुग्ण असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी मुंबईत थोडी घट दिसून आली. गुरुवारी ७८९ रुग्ण हाेते. शुक्रवारी ६९३ रुग्णांची नोंद झाली. तर २० मृत्यू झाले.

रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०९ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ आता ७१३ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत सात लाख २० हजार ३३९ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९२ हजार २४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १५,३६८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १० हजार ४३७ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Web Title: Coronavirus In Mumbai: Confusion in the number of active corona patients in Mumbai; Nearly four thousand patients showed less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.