मुंबई : मुंबईत गुरुवारी १४ हजार ८१० सक्रिय रुग्ण होते. शुक्रवारी ५७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र मुंबई पालिकेने दिलेल्या आकडेवारीत जवळपास चार हजार रुग्ण कमी दाखवून सध्या १० हजार ४३७ सक्रिय रुग्ण असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत शुक्रवारी मुंबईत थोडी घट दिसून आली. गुरुवारी ७८९ रुग्ण हाेते. शुक्रवारी ६९३ रुग्णांची नोंद झाली. तर २० मृत्यू झाले.
रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०९ टक्के एवढा आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ आता ७१३ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत सात लाख २० हजार ३३९ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९२ हजार २४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १५,३६८ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १० हजार ४३७ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.