Coronavirus : मुंबईतील कोरोनाग्रस्त हवालदाराचा मृत्यू, पोलीस दलातील पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 05:37 AM2020-04-26T05:37:53+5:302020-04-26T05:38:28+5:30

राज्यातील अनेक पोलीस अधिकारी, अंमलदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोरोनामुळे पोलीस मृत्यूमुखी पडण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

Coronavirus : Mumbai corona police killed, first victim in police force | Coronavirus : मुंबईतील कोरोनाग्रस्त हवालदाराचा मृत्यू, पोलीस दलातील पहिला बळी

Coronavirus : मुंबईतील कोरोनाग्रस्त हवालदाराचा मृत्यू, पोलीस दलातील पहिला बळी

Next

मुंबई : कोरोना झालेल्या मुंबई पोलीस दलातील एका ५७ वर्षीय हवालदाराचा शनिवारी मृत्यू झाला. ते वाकोला पोलीस ठाण्यात नियुक्तीला होते. कोरोनाची लागण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. राज्यातील अनेक पोलीस अधिकारी, अंमलदारांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोरोनामुळे पोलीस मृत्यूमुखी पडण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेले हे हवलदार मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. ते १९८८ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. ड्युुटीवर असताना कोरोना बाधित व्यक्ती संपर्कात आल्याने त्यांना लागण झाली. त्यांची चाचणी घेऊन त्यांना उपचारासाठी दाखल केले होते.
>९६ पोलिसांना लागण
गेल्या २४ तासात २२ कोरोनाबाधित पोलिसांची भर पडल्याने राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ९६ वर पोहोचला आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलातील ४१हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यापैकी ३ अधिकाऱ्यांसह एकूण ७ जण बरे झाले आहेत. उर्वरित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. अनेकांच्या चाचणीचा अहवाल आला नसल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Coronavirus : Mumbai corona police killed, first victim in police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.