CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 06:06 AM2021-05-14T06:06:06+5:302021-05-14T06:10:11+5:30

मुंबईत गुरुवारी १,९४६ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८४ हजार ४८ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७६ आहे.

CoronaVirus: In Mumbai, the duration of patients doubled to 189 days, with 1,946 infected in day | CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित

CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित

Next

 
मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीत घट होत असून, बऱ्या झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के झाला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १८९ दिवसांवर आला आहे. शहर उपनगरात दिवसभरात २ हजार ३७ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण ६ लाख २९ हजार ४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३८ हजार ६४९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत गुरुवारी १,९४६ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ८४ हजार ४८ झाली आहे, तर मृतांचा एकूण आकडा १४ हजार ७६ आहे. ६ ते १२ मेपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.३६ टक्का असल्याची नोंद आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ३०,८८६ चाचण्या, तर आतापर्यंत ५८ लाख २६ हजार ७४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
 

Web Title: CoronaVirus: In Mumbai, the duration of patients doubled to 189 days, with 1,946 infected in day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.