Coronavirus : हे ही दिवस जातील, काळजी करू नका, कोरोनाला थोपविण्यासाठी नगरसेवक सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 03:08 PM2020-03-27T15:08:17+5:302020-03-27T15:22:32+5:30
Coronavirus : मुंबई शहर आणि उपनगरातील नगरसेवक कोरोनाला थोपविण्यासाठी पुढे सरसावले असून, त्यांनी विविध माध्यमातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे.
मुंबई : कोरोनाचा आणखी प्रसार होऊ नये म्हणून मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दल प्रयत्न करत आहे. ठिकठिकाणी स्वच्छता ठेवण्यात येत असून, धूर फवारणी करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त जनजागृती करण्यात येत असून, सरकारी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. याच कामाचा एक भाग म्हणून मुंबई शहर आणि उपनगरातील नगरसेवक कोरोनाला थोपविण्यासाठी पुढे सरसावले असून, त्यांनी विविध माध्यमातून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे.
लोकांना दिलेल्या संदेशात ठिकठिकाणचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी म्हणतात की, जगावर तसेच आपल्या देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार 21 दिवसांसाठी संचारबंदी (Lockdown) करण्यात आले आहे. आमची आपण सर्वांना विनंती आहे की, कोणीही घाबरून जाऊ नये. आलेल्या संकटावर आपण सर्वांनी मिळून मात करायची आहे. आमचे विभागातील सर्व किराणा माल विक्रेत्यांचा मालकबरोबर बोलणे झाले आहे. त्यांच्याकडे पुढील 2 महिने पुरेल एवढा धान्यसाठा आहे. तसेच त्यांची दुकाने दररोज नियमित वेळेप्रमाणे चालू राहतील. बेकरी व दुध डेअरी ही नियमित वेळेप्रमाणे चालू राहतील. आपल्या विभागातील बाजारपेठा चालू राहतील. त्यामुळे विभागातील सर्व रहिवाशांनी काळजी करू नये.
बँक, ए. टी. एम. चालू आहेत. आपल्या विभागातील मेडिकल, दवाखाने हे चालूच आहेत. त्यामुळे काही घाबरण्यासारखे काही कारण नाही. आपण सर्वांनी घरातून बाहेर पडू नये. फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घरातील फक्त एकानेच बाहेर यावे. बाहेर जाताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावे. घरी आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावे आणि गर्दीत जाणे टाळावेत. खरेदीकरिता रांग लावून सर्वांना सहकार्य करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकेद्वारे विभागात धूर व औषध फवारणी करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे आवश्यक ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करण्यात येत असून, आवश्यक असल्यास गरजेच्या ठिकाणी ही सेवा दिली जाईल, असे नगरसेवकांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
दरम्यान, फेसबुक, ट्वीटर या सारख्या सोशल मीडियाचा यासाठी वापर केला जात आहे. या शिवाय रिक्षाच्या माध्यमातून लाऊडस्पीकरद्वारे कोविडबाबत जनजागृती केली जात आहे. मध्य मुंबईतील, पूर्व उपनगरातील आणि पश्चिम उपनगरातील लोकप्रतिनिधी या बाबत अधिकाधिक काम करत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबतीत आपल्याला काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करावे. सर्वांनी आप आपल्या घरी राहून पोलीस व सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक करत आहेत.
CoronaVirus: कोरोनाबाधित १९ रुग्णांना घरी सोडले, राज्यात रुग्णांची संख्या १३५वर https://t.co/rRzRisWTke
— Lokmat (@MiLOKMAT) March 27, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : प्रिय बाबा... पंतप्रधान मोदींनी शेअर केला लेकीचा ‘तो’ व्हिडीओ
Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता
Coronavirus: देशासाठी सदैव तत्पर! कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत
Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर
Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय