CoronaVirus in Mumbai : कोरोना रुग्णांसाठी सात हजार खाटा वाढविणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 08:38 PM2021-03-30T20:38:46+5:302021-03-30T20:39:23+5:30

CoronaVirus in Mumbai: सध्या कोरोना रुग्णांसाठी १३ हजार खाटा असून त्यांची संख्या १५ एप्रिलपर्यंत २० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी दिली.

CoronaVirus in Mumbai: increase 7,000 beds for Corona patients! | CoronaVirus in Mumbai : कोरोना रुग्णांसाठी सात हजार खाटा वाढविणार!

CoronaVirus in Mumbai : कोरोना रुग्णांसाठी सात हजार खाटा वाढविणार!

Next
ठळक मुद्देबाधित रुग्णांना तात्काळ शोधून काढण्यासाठी महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे.

मुंबई - कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने खाटांची संख्या वाढविण्याची तयारी सुरु केली आहे. त्यानुसार खाजगी रुग्णालयातील २२६९ खाटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ३६० अतिदक्षता विभागातील खाटांचा समावेश आहे. सध्या कोरोना रुग्णांसाठी १३ हजार खाटा असून त्यांची संख्या १५ एप्रिलपर्यंत २० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मंगळवारी दिली. (CoronaVirus in Mumbai: increase 7,000 beds for Corona patients!)

बाधित रुग्णांना तात्काळ शोधून काढण्यासाठी महापालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. ही संख्या वाढवून यापुढे दररोज ६० ते ७० हजार चाचण्या दररोज करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यामुळे येत्या कधी दिवसांमध्ये बाधित रुग्णांचा आकडा दहा हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र यापैकी तुलनेने कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. या सर्व रुग्णांना गरजेनुसार स्थानिक वॉर्ड वॉर रुममार्फतच रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असे आयुक्तांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. 

घाबरण्याचे कारण नाही... 
१० फेब्रुवारी ते ३० मार्च २०२१ या ४८ दिवसांत सापडलेल्या बाधित ८५ हजार रुग्णांपैकी ६९ हजार ५०० रुग्णांमध्ये लक्षणे नव्हती. त्‍यांना घरी विलगीकरणात ठेवण्‍यात आले. उर्वरित १५ हजार ५०० रुग्‍णांना लक्षणे असल्याने त्यापैकी आठ हजार रुग्णांना रुग्‍णालयात दाखल करावे लागले. इतरांना सौम्‍य लक्षणे असल्‍याने औषधोपचाराने ते बरे झाले. सद्यस्थितीत मुंबईत कोरोना रुग्‍णांसाठी राखीव असलेल्‍या खाटांपैकी तीन हजार खाटा रिक्‍त आहेत. यात खासगी रुग्‍णालयातील ४५० खाटांचा समावेश आहे. खाटा कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.   

सात हजार खाटा वाढिवणार.... 
मुंबईतील ३५ मोठ्या रुग्‍णालयांमध्‍ये चार हजार ८०० खाटा कोरोना रुग्‍णांच्‍या उपचारांसाठी उपलब्‍ध होत्या. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर दोन हजार ३५० खाटा इतर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आल्या होत्या. मात्र आता पुन्हा संसर्ग वाढत असल्‍याने चार हजार ८०० ही कोरोना खाटांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून सात हजार खाटा उपलब्‍ध होतील, असे आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले. 

Web Title: CoronaVirus in Mumbai: increase 7,000 beds for Corona patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.