मुंबई : जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी. रुग्णालय येथे कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात आली आहे. जे.जे.प्रमाणे समूह रुग्णालय असणाºया गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयातही कोरोनासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवारी दिली.जे. जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात ३०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ६० खाटांचा आयसीयूू विभाग असेल त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात २५० खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि ५० खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत. मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या कोरोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी १०० खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील, अशी माहितीही अमित देशमुख यांनी दिली आहे.पॅरावैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळाजे.जे. रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी जे.जे. आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयातील परिचारिका व वैद्यकीय कर्मचाºयांसाठी ‘कोविड-१९ पॅनडेमिक’ या विषयावर प्रशिक्षण घेतले. यात पूर्वतयारी, रुग्णसंख्या वाढल्यास काय काळजी घ्यायची, कोणत्या उपाययोजना करायच्या याविषयी सविस्तर व्याख्या आणि मॉकड्रील घेण्यात आले.
CoronaVirus in Mumbai : जे.जे., जीटीतही कोरोनासाठी स्वतंत्र खाटांचे मोठे व्यवस्थापन, अमित देशमुख यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 1:39 AM