CoronaVirus in Mumbai : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८९ जणांना बेड्या; मुंबईत १७० गुन्हे दाखल, मुंबई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:22 AM2020-03-28T01:22:45+5:302020-03-28T01:23:41+5:30

CoronaVirus in Mumbai : मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमानवये संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशांचाही समावेश आहे.

CoronaVirus in Mumbai: Mumbai police files 170 crimes, Mumbai police action | CoronaVirus in Mumbai : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८९ जणांना बेड्या; मुंबईत १७० गुन्हे दाखल, मुंबई पोलिसांची कारवाई

CoronaVirus in Mumbai : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २८९ जणांना बेड्या; मुंबईत १७० गुन्हे दाखल, मुंबई पोलिसांची कारवाई

googlenewsNext

मुंबई : लॉकडाउनच्या काळात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गेल्या सहा दिवसांत १७० गुन्हे दाखल झाले असून, २८९ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २२ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
मुंबईपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी फौजदारी दंड संहितेच्या १४४ कलमानवये संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशांचाही समावेश आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंड संहितेतील १८८ कलमान्वये हे गुन्हे नोंदविण्यात येत आहेत. २० मार्च ते २६ मार्च रात्री १२ पर्यंत मुंबईत १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात, कोरोनाचे संशयित म्हणून दोन आठवड्यांसाठी घरी राहण्याच्या सूचना देऊनही घराबाहेर भटकणाºया २ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या दाखल गुन्ह्यांत २८९ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २२ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. यात २५ आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तर १७६ जणांना जामिनावर सोडून देण्यात आले आहे. नागरिकांनी घरी राहण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

Web Title: CoronaVirus in Mumbai: Mumbai police files 170 crimes, Mumbai police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.