Coronavirus : मुंबई पालिका करणार घरोघरी जाऊन कोविड-१९ची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:53 AM2020-03-24T01:53:58+5:302020-03-24T06:03:11+5:30

coronavirus : सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी उपलब्ध आहे.

Coronavirus: Mumbai municipality will go door-to-door and test Covid-19 | Coronavirus : मुंबई पालिका करणार घरोघरी जाऊन कोविड-१९ची चाचणी

Coronavirus : मुंबई पालिका करणार घरोघरी जाऊन कोविड-१९ची चाचणी

Next

मुंबई : संशयित रुग्णांची कोविड-१९ चाचणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचे नवीन दूरध्वनी क्र मांक सुरू होत आहेत. ही सुविधा पुढील दोन दिवसांपासून सुरू होईल.
सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी उपलब्ध आहे. हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित झाल्यानंतर हेल्पलाइनवर डॉक्टर संशयित रु ग्णांची पूर्ण माहिती घेतील. गरज भासल्यास कोविड चाचणी करण्याचा सल्ला देतील. चाचणी नमुना घरी येऊन घेणे आणि तपासणीसाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेत पाठविणे, यासाठी समन्वय करून देतील.

Web Title: Coronavirus: Mumbai municipality will go door-to-door and test Covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.