CoronaVirus: गुंतागुंत वाढली! १०४ रुणांमध्ये सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 09:11 PM2020-03-28T21:11:19+5:302020-03-28T21:21:32+5:30

राज्यात कोरोना बाधितांची संख्या १८१; आज आढळले २८ रुग्ण

CoronaVirus in mumbai no symptoms of covid 19 in 104 patient currently kkg | CoronaVirus: गुंतागुंत वाढली! १०४ रुणांमध्ये सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत

CoronaVirus: गुंतागुंत वाढली! १०४ रुणांमध्ये सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत

Next

मुंबई- राज्यात शनिवारी आणखी २८ कोरोना (कोविड-१९) रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत.  पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील चार रुग्ण आहेत. सध्या बाधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना कोरोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५  व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.  

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
जिल्हा/मनपा         बाधित रुग्ण
मुंबई                          ७३
सांगली                       २४
पुणे मनपा                   १९
पिंपरी चिंचवड            १२
नागपूर                        ११
कल्याण-डोबिवली       ७
नवी मुंबई                    ६
ठाणे                            ५
यवतमाळ, वसई विरार प्रत्येकी ४
अहमदनगर                 ३
सातारा, पनवेल प्रत्येकी २
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी १
इतर राज्ये - गुजरात १
एकूण १८१
 

Web Title: CoronaVirus in mumbai no symptoms of covid 19 in 104 patient currently kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.